
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांची आवडती अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तमाशा लाईव्ह’ असं सोनालीच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील रंग लागला हे गाणे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या गाण्यावर अनेक कलाकार, नेटकरी रिल्स बनवताना दिसत आहे. दरम्यान सोनालीने लंडनच्या टॉवर ब्रिजवर रंग लागला या गाण्यावर रिल बनवले आहे. सध्या तिचा हा रिल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोनाली कुलकर्णीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिचा आगामी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’मधील रंग लागला या गाण्यावर नाचताना दिसत आहे. यात तिच्यासोबत प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकरही नाचताना दिसत आहे. या दोघीही सध्या लंडनमध्ये आहे. त्या दोघीही लंडनच्या प्रसिद्ध टॉवर ब्रीजवर नाचताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
सोनालीने स्वत: तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “लंडनच्या टॉवर ब्रीजवर फुलवा खामकरसोबतची काही वेगळीच जादू. धन्यवाद युगेशा ओमकार हे इतक्या संयमाने आणि सुंदरपणे टिपल्याबद्दल” असं सोनालीने लिहिलं आहे.