
बॉलिवूडची अप्सरा सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिचा नवा सिनेमा ‘तमाशा लाईव्ह’ (Tamasha Live) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. सध्या काय तर सोनाली या चित्रपटाचं जोरात प्रमोशन करकरताना दिसतेय. पण याचदरम्यान सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात सोनाली टीव्ही अँकरच्या रूपात एका चॅनेलच्या न्यूजरूममध्ये बसून बातम्या देताना दिसतेय. त्यासुद्धा खऱ्या खुऱ्या बातम्या.
View this post on Instagram
सोनालीने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनाली स्वत:ची ओळख शेफाली अशी करून देते. अँकरच्या रूपात ती दिसते आणि अगदी खºया पत्रकाराप्रमाणे बुलेटिन देते. आता ही काय भानगड आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे. या चित्रपटामध्ये सोनाली एका पत्रकाराची भूमिका साकारते आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
सोनालीचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तू काहीही करू शकतेस, अशा शब्दांत एका चाहत्याने तिचं कौतुक केलं आहे.