केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देशांतून लग्नाच्या अनेक आश्चर्यकारक घटना समोर येत असतात आणि त्या व्हायरल होतात. कधी कधी ही प्रकरणे गमतीशीर असतात, तर कधी कधी अनेक गंभीर घटनाही समोर येतात. अशीच एक घटना ब्रिटनमधून समोर आली आहे जिथे नववधूने लग्नाच्या एका दिवसानंतर नवऱ्याला घटस्फोट दिला. नवऱ्याने वधूच्या इच्छेविरुद्ध कृत्य केल्याने हा सर्व प्रकार घडला.
वास्तविक, ही घटना लग्नाच्या दुसर्या दिवशी लग्नाची पार्टी सुरू असताना घडली. द मिररने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने स्वतः ही संपूर्ण घटना तिच्या सोशल मीडियावर सांगितली आहे. महिलेने सांगितले की, तिच्या पतीने तिच्या लग्नाच्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर केक लावला होता, जो तिला अत्यंत अपमानास्पद वाटला. त्यामुळे तिने पतीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला.
तिने सांगितले की, लग्नानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा केक कापण्याचा सोहळा होत होता, तेव्हा कोणीही तिच्या चेहऱ्यावर केक लावू नये असे तिने सांगितले होते. असे सांगूनही तिच्या पतीने तिच्या चेहऱ्यावर केक लावला. नवरी मुलगी आपल्या नवऱ्याला थांबवत राहिली पण त्याने काहीच ऐकले नाही. यानंतर महिलेला राग आल्याने दोघांमध्ये वादावादी झाली. प्रकरण इतके पुढे गेले की, महिलेने या घटनेनंतर लगेचच सर्वांसमोर घटस्फोट घेणार असल्याची घोषणा केली.