धक्कादायक: नशा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नीसोबत केलं असं काही…

WhatsApp Group

ठाणे : नशा करण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून रिक्षाचालक पतीने आपल्याच पत्नीला चालू रिक्षामधून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती एवढ्यावरच न थांबता त्याने पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरी आणले आणि तिला रॉड च्या सहाय्याने पुन्हा बेदम मारहाण केली. महिलेच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

ठाणे येथील वागळे इस्टेट इंदिरानगर परिसरामध्ये राहणाऱ्या कृष्णानंद सिंग उर्फ हॅप्पी याने आपल्या पत्नीकडे नशा करण्यासाठी पैसे मागितले. महिलेने आपला पगार झाला नाही असे पतीला सांगितले. हे ऐकून नशेखोर पतीने पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिला मारहाण केली त्यानंतर तिला फरफटत बाहेर काढत जबरदस्ती रिक्षामध्ये बसवून  पुढे हायवेला आल्यानंतर त्याने आतिला रिक्षातून ढकलून दिले. यात महिला गंभीर जखमी झाली.

बापरे! डॉक्टरांनी 15 वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढली चार्जिंग केबल

Coronavirus In India: चीनमधील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर!

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा