क्रिकेटच्या मैदानावर अशी काही दृश्ये अनेकदा पाहायला मिळतात, जी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. अशी काही दृश्येही पाहायला मिळतात, ज्यांना पाहून लोक हसायला भाग पाडतात. आता असेच दृश्य दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये सुरू झालेल्या नव्या टी-20 लीगमध्ये पाहायला मिळाले. या लीगदरम्यान पाकिस्तानी अँकरसोबत असे काही घडले. टूर्नामेंटच्या एका सामन्यादरम्यान पाकिस्तानी महिला अँकर झैनबसोबत लाइव्ह मॅचमध्ये असे काही घडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रथम फलंदाजी करताना MI केप टाउनने सनरायझर्स इस्टर्न केपला 172 धावांचे लक्ष्य दिले होते. MI केप टाउनने दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी सनरायझर्सचे खेळाडू जबरदस्त फटकेबाजी करत होते. त्याचवेळी जैनब अब्बास सीमारेषेजवळ मुलाखत घेत होती.
“This is coming straight for us..” 🫣@ZAbbasOfficial, you good? 🤣@CapeTownCityFC your manager somehow avoided the contact! pic.twitter.com/32YPcfLCMf
— SuperSport 🏆 (@SuperSportTV) January 18, 2023
सनरायझर्सच्या डावातील 13व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज मार्को जॅन्सन स्ट्राइकवर होता. त्याने सॅम करन च्या चेंडूवर एक शॉट खेळला जो थेट सीमारेषेच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी चेंडूच्या मागे धावत होता. तेवढ्यात सीमारेषेवर इंटरव्ह्यू करत असलेल्या पाकिस्तानी अँकरला फिल्डरने टक्कर दिली. त्यामुळे पाकिस्तानी अँकर झैन धाडकन कोसळली या घटनेत झैनब अब्बासला कोणतीही दुखापत झाली नाही.