धक्कादायक! नवरदेवाला वरमाळा घालताच घडलं असं काही….,नवरीचा स्टेजवरच मृत्यू

WhatsApp Group

लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा दिवस असतो. कारण या दिवसापासूनच माणसांच संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. वर आणि वधू दोघांच्या कुटुंबीयांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस असतो. मात्र, अनेकदा लग्नात अशा काही घटना घडतात, ज्यामुळे हा आनंद क्षणात दुःखात बदलून जातो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील मलिहाबाद येथे घडली आहे. या घटनेत लग्नाच्या स्टेजवरच नवरीचा मृत्यू झाला.

आनंदाच वातावरण अचानक दुःखात बदललं. नवरदेवाला वरमाळा घातल्यानंतर खुर्चीवर बसण्यासाठी जात असलेली नवरी अचानक खाली कोसळली. मेडिक कॉलेजमध्ये तपासणीनंतर तिला मृत घोषित करण्यात आलं. याबाबत दोन्ही कुटुंबांना कळताच मोठा धक्का बसला. शनिवारी सकाळी या तरुणीवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा