लष्करी श्वान झूमला जवानांनी वाहिली श्रद्धांजली

WhatsApp Group

या आठवड्याच्या सुरुवातीला जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत गोळीबारात लष्कराच्या ‘झुम’ या श्वानाचे गुरुवारी (दि. 13) दुपारी निधन झाले. यानंतर भारतीय लष्काराच्या 29 आर्मी डॉग युनिटने आणि त्याच्या साथीदारांनी जम्मूमध्ये भारतीय लष्करी श्वान ‘झूम’ला आदरांजली वाहिली आहे. या वेळी 29 आर्मी डॉग युनिट उपस्थित होते. अडीच वर्षांचा झूम गेल्या 10 महिन्यांपासून लष्कराच्या 15 कॉर्प्सच्या असॉल्ट युनिटशी संबंधित होता.

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये सोमवारी (10 ऑक्टोबर) सकाळी लष्कराच्या अ‍ॅसॉल्ट डॉग झूमच्या मदतीने दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. या चकमकीदरम्यान झूमलाही दोन गोळ्या लागल्या. त्याच्यावर श्रीनगर येथील लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

 

ज्या घरात दहशतवादी लपले होते ते घर साफ करण्याचे काम झूमला देण्यात आले होते. झूमने घरात जाऊन दहशतवाद्यांवर हल्ला केला. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतरही झूम दहशतवाद्यांशी लढत राहिला. अडीच वर्षांचा झूम गेल्या 10 महिन्यांपासून लष्कराच्या 15 कॉर्प्स असॉल्ट युनिटशी संबंधित होता.