उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी एक भन्नाट प्रयोग केला आहे. या दोन्ही शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाची चर्चा राज्यासह पूर्ण देशभर होत आहे. या शेतकऱ्यांनी चक्क मातीविना जरबेरा फुलशेती soilless Gerbera Flower Farming केली आहे. सुरुवातील यांची मस्करी करण्यात आली मात्र त्यांचा मातीविना शेती करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यांनतर सगळेजण त्यांचे कौतुक करत आहेत.
उस्मानाबाद येथील कळंब तालुक्यातील बोर्डा येथील शितल चव्हाण आणि दिनेश चव्हाण यांनी पॉलिहाऊस उभारुण बेडच्या मदतीने केलेली मातीविना जरबेरा फुलशेती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पॉलिहाऊस त्यांनी 20 गुंठ्यामध्ये जेरबेराची बाग फुलवली आहे. कुंड्यामध्ये कोकोपीट टाकून जरबेराची लागवड केल्याने कीड-रोगराईचा प्रादुर्भाव कमी झाला असून त्यांना मोठा फायदा झाला आहे.
???? ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा ???? https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms
For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook