तुनिषा शर्मानंतर आणखी एका स्टारची आत्महत्या, 22 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

WhatsApp Group

Leela Nagvanshi Committed Suicide: छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे 22 वर्षीय सोशल मीडिया स्टार लीला नागवंशी हिने आत्महत्या केली आहे. लीला नागवंशी हिने आत्महत्या का केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. सध्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. लीला नागवंशी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना रायगड जिल्ह्यातील केलो बिहार कॉलनीची आहे.

लीलाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. सध्या पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी लीलाला खोलीत फासावर लटकलेली पाहिली तेव्हा तिला वाचवण्यासाठी तिला तत्काळ खाली उतरवले पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. वैयक्तिक कारणामुळे ती डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

लीना नागवंशी या 22 वर्षीय तरुणीचे इन्स्टाग्रामवर दहा हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यासोबतच तिच्या अनेक व्हिडिओंनाही खूप लाइक आहेत. आपल्या वैयक्तिक कारणामुळे तिने आपल्या आयुष्याला अलविदा केल्याचे सांगितले जात आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा