Women’s World Cup : स्मृती मंधानाची बॅट तळपली, वेस्ट इंडिज विरूद्ध दमदार शतक!

WhatsApp Group

टीम इंडियाची प्रमुख बॅटर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले शतक झळकावले आहे. न्यूझीलंडमध्ये सूरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup) भारताची लढत वेस्ट इंडिज विरूद्ध (India Women vs West Indies Women) सुरू आहे. या मॅचमध्ये स्मृतीने शतक झळकावले आहे. स्मृतीने हे शतक 108 बॉलमध्ये पूर्ण केले. या खेळीत तिने 9 फोर आणि 2 सिक्स लगावले.

वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज विरूद्धचं स्मृतीचं हे दुसरे शतक आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये 2017 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्येही स्मृतीनं शतक झळकावले होते. स्मृतीने पाकिस्तान विरूद्ध अर्धशतक झळकावत स्पर्धेची सुरूवात जोरदार केली होती. त्यानंतर न्यूझीलंड विरूद्ध ती झटपट आऊट झाली. न्यूझीलंड विरूद्धच्या पराभवानंतर भारतीय टीम जिद्दीनं या मॅचमध्ये उतरली आहे.

या शतकासह स्मृतीने मंधनाने मिताली राजचा एक मोठा विक्रम मोडला आहे.  मितालीला मागे टाकत स्मृती आता मायदेशाबाहेर ५ वनडे शतके करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी ४ शतकांसह हा विक्रम मिताली राजच्या नावावर होता.

भारतीय महिला टीमने (Team India Women) वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात वेस्ट इंडिज विरूद्ध एकही मॅच गमावलेली नाही. यापूर्वीच्या सर्व 6 मॅच टीम इंडियाने जिंकल्या आहेत. हाच इतिहास कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.