
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती स्मृती मंधाना हिने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सलामीवीर म्हणून T20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दुसरीकडे, जर आपण पुरुष आणि महिला क्रिकेटबद्दल बोललो तर मंधानापूर्वी केवळ भारतीय कर्णधार रोहित शर्माने हा पराक्रम केला होता. रोहित शर्माने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून 2973 धावा केल्या आहेत. या दोघांशिवाय, कोणत्याही भारतीय सलामीवीराला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2000 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.
बुधवारी रात्री बार्बाडोसविरुद्धच्या सामन्यात मंधाना फार काही दाखवू शकली नाही. केवळ 5 धावा करून ती बाद झाली, पण या धावांच्या जोरावर तिने सलामीवीर म्हणून T20 मध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. मंधानाने आता 80 सामन्यांमध्ये 27.45 च्या सरासरीने 2004 धावा केल्या आहेत, तिच्या T20 कारकिर्दीबद्दल बोलायचे तर 90 सामन्यांमध्ये तिने 26.23 च्या सरासरीने 2125 धावा केल्या आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या तिसऱ्या सामन्यात बार्बाडोस संघाचा 100 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाकडून गमावला होता. मात्र त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचा आठ विकेट्स राखून पराभव केला होता. धावांच्या बाबतीत भारताचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी होणार आहे. जर भारताने उपांत्य फेरीत विजय मिळवला तर ते अंतिम फेरीत आणि हरले तरी पदकाच्या शर्यतीत कायम राहतील. फायनलपूर्वी रविवारीच ब्राँझपदकाची लढत होणार आहे.
सलामीवीर म्हणून T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (भारतीय फलंदाज)
रोहित शर्मा – 2973
स्मृती मानधना – 2004