IND W Vs SA W: स्मृती मानधनानं दोन वर्षांनंतर शतक ठोकलं, ‘हे’ मोठे विक्रम केले नावावर

WhatsApp Group

Smriti Mandhana Century : दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतात त्याला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका, एक कसोटी आणि तीन टी-२० मालिका खेळायची आहेत. या दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना बेंगळुरूमध्ये खेळवला जात आहे. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासह भारतीय महिला संघानं २०२५ मध्ये होणाऱ्या विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे.

टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे हे तिचे दुसरे शतक आहे. तिनं ७ फेब्रुवारी २०१८ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले शतक झळकावले. या काळात त्याने १३५ धावांची इनिंग खेळली होती. याशिवाय स्मृती मंधानाचे हे गेल्या दोन वर्षांतील वनडेतील पहिले शतक आहे.

११७ धावांची शानदार खेळी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२७ चेंडूत ११७ धावांची खेळी खेळली. या खेळीत तिनं १२ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघानं २६५ धावा केल्या. त्यांच्याशिवाय दीप्ती शर्मानं ३७ धावांची नाबाद खेळी तर पूजानं ३७ धावांची नाबाद खेळी खेळली.

स्मृती मानधनाने २०२२ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध तिचे शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. गेल्या दोन वर्षात तिने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यानं धावा केल्या आहेत, पण शतक झळकावण्यापासून ती हुकली होती.

या खेळीदरम्यान माजी कर्णधार मिताली राज (१०,८६८ धावा) नंतर ७,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारी स्मृती मानधना दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. याशिवाय, ती भारतीय महिला संघाच्या वतीनं सर्वाधिक शतके झळकावणारी खेळाडू बनली आहे. त्याने हरमनप्रीत कौरलाही मागे टाकलं आहे.