खराब फॉर्ममध्ये असलेली भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिला आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये मोठा (ICC Rankings) धक्का बसला आहे. चौथ्या क्रमांकावर असलेली मिताली राज आता तीन स्थान खाली सातव्या क्रमांकावर आली आहे.
तर टीम इंडियाची ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) 11 व्या क्रमांकावर आली आहे. मितालीने सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 31 आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 5 रन केले होते.
तर दुसरीकडे स्मृती मंधानाने वेस्ट इंडिजविरुद्ध 123 रनची खेळी केल्यानंतरही ती टॉप-10 मध्ये राहू शकली नाही. बॅटिंगमध्ये न्यूझीलंडची सॅटर्थवेट आणि दक्षिण आफ्रिकेच्या वोल्वार्ट हिला फायदा झाला आहे. सॅटर्थवेट पाच स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर तर वोल्वार्ट पाचव्या क्रमांकावर आली आहे. ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली बॅटिंगमध्ये आपले स्थान पहिल्या क्रमांकावर कायम ठेवले आहे.
???? Batters Satterthwaite, Wolvaardt make big gains
???? Marizanne Kapp enters top five in bowlers list
???? Hayley Matthews makes all-round gainsA lot of movements in the @MRFWorldwide ICC Women’s ODI Player Rankings this week.
Details ???? https://t.co/Tjimjhe5f1 pic.twitter.com/LfJbXc9kak
— ICC (@ICC) March 15, 2022
वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारी भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीलाही (Jhulan Goswami) दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. झुलन गोस्वामी आता सहाव्या क्रमांकावर आहे. तर दीप्ती शर्मा ऑलराऊंडरच्या क्रमवारीमध्ये सहाव्या क्रमांकावर कायम राहिली आहे.इंग्लंडला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही, पण सोफी एक्लेस्टोन ही बॉलरच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. .