
SL vs NED: दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने गुरुवारी नेदरलँड्सचा 16 धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 मध्ये प्रवेश केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 162 धावा केल्या. 163 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडच्या संघाने चांगली फलंदाजी केली पण त्यांना लक्ष्य गाठता आले नाही आणि सामना गमवावा लागला.
163 धावांचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँड संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि 23 धावांवर विक्रमजीत सिंगच्या (7) रूपाने संघाला पहिला धक्का बसला. त्याचवेळी, नेदरलँडकडून मॅक्स ओ’डॉड (71) आणि स्कॉट एडवर्ड्स (21) यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे नेदरलँड्सने हा सामना 16 धावांनी जिंकला. शेवटच्या षटकांमध्ये ओ’डॉडने मोठे फटके मारून नेदरलँड्सच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र एकाही फलंदाजाची साथ न मिळाल्याने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. ओ डाउडने आज 53 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 71 धावांचे अर्धशतक झळकावले. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने 3 बळी घेतले. हसरंगाशिवाय महिष तेक्षानाने दोन गडी बाद केले.
Sri Lanka beat Netherlands by 16 runs to seal their qualification to the Super 12 stage 👏#T20WorldCup | #NEDvSL | 📝 https://t.co/mBr5xrkvMw pic.twitter.com/3R4EdIo7cV
— ICC (@ICC) October 20, 2022
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. श्रीलंकेला पहिला झटका 36 धावांवर पथुम निसांकाच्या (14) रूपाने बसला. मात्र, श्रीलंकेचा दुसरा सलामीवीर कुशल मेंडिस एका टोकापासून शेवटपर्यंत टिकून राहिला आणि त्याने नेदरलँड्सविरुद्ध 44 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 79 धावांचे शानदार अर्धशतक झळकावले. कुशलच्या या शानदार खेळीमुळे श्रीलंकेचा संघ नेदरलँड्सविरुद्ध 162 धावा करू शकला.