Skin Care Tips: शरीरावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी कोरफडसोबत मिसळा ‘या’ 3 वस्तू

WhatsApp Group

Skin Care Tips: वाढत्या वयात शरीरावर सुरकुत्या येणे सर्वांसाठी सामान्य गोष्ट आहे. शरीरावर गर्भावस्थेनंतर किंवा वजन कमी (Weight Loss) केलेल्यांना सुरकुत्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते. महिलांमध्ये गर्भावस्थेनंतर सामान्यतः शरीरावर सुरकुत्या (Stretch Marks) पडतात. या समस्येवर कोरफडीचा (Aloe Vera) उपाय रामबाण ठरतो. कोरफडीच्या वापराने (Aloe Vera Use Tips) फक्त सुरकुत्यापासूनच आराम मिळतो असे नाही तर त्वचा चमकदार (Shiny Skin) करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊया

हे 3 उपाय करा 

सुरकुत्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही मध आणि कोरफडचा देखील वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला मध आणि कोरफडीच्या गराचे मिश्रण तयार करावे लागेल. तयार झालेले हे मिश्रण सुरकुत्या असलेल्या ठिकाणी लावा. काही वेळाने हे मिश्रण साध्या पाण्याने धुवून काढा. असे केल्यामुळे सुरकुत्याची समस्या कमी होत त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

लिंबूच्या रसासोबत कोरफड जेल सुरकुत्या असलेल्या जागी लावल्यास समस्या दूर होते. यासाठी तुम्हाला एका वाटीत लिंबूचा रस आणि कोरफडीचा गर चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. त्यानंतर सुरकुत्या असलेल्या भागावर हे मिश्रण लावून थोड्या वेळाने धुवा. हे उपाय नियमित केल्यास हळूहळू सुरकुत्याची समस्याच दूर होत त्वचा चमकदार होते.

तुम्ही जर शरीरावरील सुरकुत्यामुळे त्रस्त असाल तर कोरफड गरासोबत खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा. हे मिश्रण तयार करण्यासाठी एका वाटीत कोरफड गर घेत त्यात खोबऱ्याचे तेल घाला. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. तयार झालेले मिश्रण सुरकुत्यावर लावा. असे केल्यामुळे सुरकुत्या कमी होत आराम मिळेल.