शाळेतील शौचालयात सापडला सहावीतील मुलीचा मृतदेह

0
WhatsApp Group

वाशी येथे शाळेतच सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वाशीतील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुग्धा महेंद्र कदम असे मृत तरुणीचे नाव असून ती आपल्या कुटुंबासह कोपरखैरणे येथे राहते.

वाशीच्या सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वच्छतागृहात या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्वच्छतागृह साफ करणारी महिला साफसफाईसाठी गेली असता ही घटना उघडकीस आली. विद्यार्थ्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शौचालयात मृतदेह आढळल्याने शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.