कानपूर – यूपीच्या कानपूर जिल्ह्यात रविवारी रात्री एक खळबळजनक दुर्घटना घडली Kanpur bus accident. येथे एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने अनेक प्रवाशांना चिरडले. कानपूर टाट मिल चौराहा येथे झालेल्या या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अनेक जखमींना रुग्णालयात दाखल केले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी चौकात मोठी गर्दी होती त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
Uttar Pradesh: At least six killed and 9 injured in an electric bus accident in #Kanpur
— DD News (@DDNewslive) January 31, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री घंटाघरहून ताटमीळला इलेक्ट्रिक सिटी बस जात होती. यादरम्यान 12.45 च्या सुमारास बस एका ट्रॅफिक बूथवर धडकली. बसची धडक बसल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला.
Electric Bus at Tatmil Ghantaghar #Kanpur after loosing control injuring many people. Nearly 7 dead on the spot.@kanpurnagarpol pic.twitter.com/KoIrgYLzzj
— Abushahma Khan (@abushahma007) January 30, 2022
या भयानक धडक अपघातानंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. तसेचं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.