पालक ही हिरव्या भाज्यांमधील सर्वात प्रमुख भाजी समजली जाते. तुम्ही पालक कच्ची खाऊ शकता, भाजी बनवुनही खाऊ शकता, सलाडमध्ये वापर करून खाऊ शकता, पालकचं सूप बनवून पिऊही शकता. पालकमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि लोह मोठ्या प्रमाणावर मिळतात.
पालक खाणे दृष्टी सुधारण्यासाठी, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि योग्य रक्तदाब राखण्यासाठी फायदेशीर आहे. अनेकदा डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांकडून आपल्या भोजणात पालकाच्या भाजीचा सामवेश करण्याचा सल्ला आपल्याला दरवेळी मिळत असतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात पालक ही भाजी खाल्याने आपल्या आरोग्याला होणाऱ्या या सहा महत्वाच्या फायद्यांबद्दल.
1. हाडे मजबूत बनवतात
आपल्या शरीरातील हाडे ही कॅल्शियममुळे मजबूत असतात हे सर्वांनात माहित असेल. दुधाव्यतिरिक्त, पालकमध्ये देखील कॅल्शियम पुरेशा प्रमाणात आढळते. त्यामुळे पालक खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
2. दृष्टी वाढवते
व्हिटॅमिन ए दृष्टी वाढवण्यासाठी फायदेशीर असते. गाजरा व्यतिरिक्त, पालकमध्ये देखील पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे दृष्टीही सुधारण्यास मदत होते.
3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
पालकमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स पुरेशा प्रमाणात असतात. पालक खाल्ल्याने शरीरात संक्रमणाचा धोका कमी होतो आणि तुम्ही आजारी पडत नाहीत.
4. ऊर्जा पुरवते
पालकमध्ये मॅग्नेशियम नावाचे पोषक घटक पुरेशा प्रमाणात असतात. मॅग्नेशियम शरीराला ऊर्जा देते. पालक खाल्ल्याने वारंवार थकवा येण्याची समस्या दूर होते.
5. अशक्तपणा नाही
अशक्तपणा असलेल्या लोकांसाठी पालक खाणे खूप फायदेशीर ठरते. पालकमध्ये पुरेशा प्रमाणात लोह असते, त्यामुळे पालक सेवन केल्याने अशक्तपणा येत नाही.
6. वजन कमी करण्यासाठी
पालकमध्ये चरबी आणि कॅलरीज खूप कमी असतात. याव्यतिरिक्त, त्यात फायबरची पुरेशी मात्रा देखील असते, म्हणून पालक खाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.