
देशाला यंदाची मिस इंडिया मिळाली आहे. कर्नाटकच्या (Karnataka) सिनी शेट्टीने(Sini Shetty) मिस इंडिया 2022 चा किताब आपल्या नावे केला आहे. 3 जुलै रोजी मुंबईमध्ये (Mumbai) पार पडलेल्या मिस इंडिया 2022 च्या अंतिम फेरीत 31 फायनलिस्टवर मात देत सिनीने ‘मिस इंडिया 2022’चा मुकूट आपल्या नावे केला. तर राजस्थानची रुबल शेखावत ही फर्स्ट रनर अप तर उत्तर प्रदेशची शिंता चौहान दुसरी रनर अप ठरली आहे.
दरवेळेप्रमाणेच यंदाही मिस इंडिया स्पर्धा अतिशय चुरशीची होती. मिस इंडिया 2022 च्या ग्रँड फिनालेला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यामध्ये नेहा धुपिया, क्रिती सेनन, मलायका अरोरा, मनीष पॉल, राजकुमार राव, डिनो मोरिया, मिताली राज यांच्यासह अनेक कलाकार होते. क्रिती सॅननपासून ते इतर अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपली मोहिनी पसरवली. नेहा धुपियासाठी ही संधी अधिक खास बनली कारण तिला मिस इंडियाचा किताब जिंकून २० वर्षे झाली आहेत.
View this post on Instagram
मिस इंडिया 2022 चा किताब जिंकणारी सिनी शेट्टी फक्त 21 वर्षांची आहे. सध्या ती चार्टर्ड फायनान्स अॅनालिस्ट कोर्स करत आहे. सिनीला डान्सची खूप आवड आहे, तिने वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत तिने अनेक शो केले आहेत. शेट्टी ही कर्नाटकची रहिवासी असून तिचा जन्म मायानगरी मुंबईमध्ये झाला.