Zubeen Garg: गायक झुबीन गर्गच्या डोक्याला दुखापत, रुग्णालयात उपचार सुरु

WhatsApp Group

गायक आणि संगीतकार झुबीन गर्गच्या डोक्याला आज किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर त्याला आसामच्या दिब्रुगढमधील खाजगी रुग्णालयात दाखल झाले. पुढील उपचारांसाठी त्याला गुवाहाटी येथे विमानाने हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असून धोका टळला आहे असे, असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झुबीन  बाथरुममध्ये बेशुद्ध होऊन पडला होता. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.