मुंबई – गायिका वैशाली भैसने Vaishali Bhaisne हिने फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे कलाकार मंडळींसह अनेकांनी आता सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. तिने आपल्या जीवाला धोका असल्याची पोस्ट केली आहे. तसेच यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे असंही तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. याबाबत आपण 2 दिवसांत पत्रकार परिषद घेऊन सांगणार असल्याचेही तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मराठमोळी गायिका वैशाली भैसने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे की,”काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे.आज मला तुमच्या support ची गरज आहे.”
गायिका वैशाली म्हाडेने गेल्या काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. तिला विदर्भाचे विभागीय अध्यक्षपद देखील देण्यात आले होते.