Singer KK : प्रसिद्ध गायक ‘KK’ पंचतत्वात विलीन,भावूक वातावरणात अखेरचा निरोप

WhatsApp Group

Singer KK : प्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath – KK) हे पंचतत्वात विलीन झाले आहेत. मुंबईत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गायक हरिहरन, सलीम मर्चंट, शंकर महादेवन, जावेद अख्तर यांसह बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मंगळवारी (३१ जुलै) रात्री कोलकाता (Kolkata) येथे निधन झाले होते. आता त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. यावेळी केके यांचा परिवार, मित्र परिवार आणि चाहत्यांना अश्रू अनावर झाले होते.