सिनेसृष्टीवर शोककळा; ‘मेरा रंग दे बसंती…’ गाण्याचे गायक भूपिंदर सिंह यांचं निधन

WhatsApp Group

आपल्या सुंदर आवाजासाठी ओळखले जाणारे जेष्ठ गायक भूपिंदर सिंह यांचं निधन (singer bhupinder singh passes away) झाल्याची माहिती मिळत आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भूंपिदर सिंह यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांचा सामना करत होते, त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झालं होतं. अखेर आज मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या मृतदेहावर आज रात्री 12.30 मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

भूपिंदर सिंह यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या आवाजाची छाप निर्माण केली. तसेच त्यांनी मोहम्मद रफी, तलत महमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत अनेक गाणी गायली आहेत. ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘प्यार हमें किस मोड पे ले आया’, ‘हुजूर इस कदर’, ‘एक अकेला इस शहर मे’, ‘जिंदगी मिलके बिताएंगे’, ‘बीती ना बितायी रैना’, ‘नाम गुम जाएगा’ ही त्यांची गाणी तुफान गाजली. अशी अनेक  गाणी त्यांनी गायली आहेत.