सिंधुदुर्ग हादरलं; भर बाजारात पेट्रोल टाकून महिलेला पेटवलं, महिलेचा मृत्यू

WhatsApp Group

सिंधुदुर्ग Sindhudurg : सिंधुदुर्गातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. भर बाजारात पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. मालवणमध्ये ही घटना घडली आहे. प्रीती केळुस्कर (वय 35 ) असं या महिलेचं नाव आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.