मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज चिपी विमानतळाचा (Chipi Airport)  लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्यं म्हणजे नारायण राणे (narayan rane) देखील या कार्यक्रमात उपस्थित असणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी शिवसेनेत एकत्र असणारे हे दोन नेते आज कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यानंतर त्यांच अटकसत्र आणि आज या विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी एकाच मंचावर येणं याकडे संगळ्यांच लक्ष लागून आहे.

तब्बल 20 वर्षानंतर चिपी विमानतळाचं काम पूर्ण झाल असून आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे हे दोन नेते एकत्र आल्यावर काय बोलणार? त्यांची देहबोली कशी असेल यांकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे.

नारायण राणे सिंधुदुर्गला रवाना झाले तेव्हा ते बोलताना म्हणाले ‘उद्धव ठाकरे समोर आले म्हणून काय होतं? मुख्यमंत्री आहेत म्हटल्यावर आम्ही त्यांच स्वागत नक्की करू. विमानतळाच्या सोहळ्यासाठी एकत्र येणार आहोत त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारच राजकारण करणार नाही. हा सर्वांसाठीच आनंदाचा क्षण आहे.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) हे दुपारी दोन वाजता राजीव गांधी भवनातून झेंडा दाखवून या विमानतळाचं व्हर्च्युअली उद्घाटन करतील, नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  चिपी विमानतळावरून प्रत्यक्ष या विमानतळाचं लोकार्पण करणार आहेत.