
बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि फॅशन दिवा उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फीने तिच्या फॅशन सेन्सने भल्याभल्यांचे होश उडवले आहे. उर्फीचा नवा आउटफिट पाहून तुमचीही तारांबळ उडेल. यावेळी उर्फीने मोबाईलच्या सिमकार्डने तिचा ड्रेस बनवला आणि परिधान केला. उर्फी जावेदने आता सिमकार्डपासून बनवलेले कपडे घातले आहेत. हा ड्रेस परिधान करून उर्फीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेयर केला आहे.
उर्फी जावेद व्हिडिओने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ड्रेस विचित्र असला तरी या फोटोंमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये उर्फी जावेदने क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घातलेला दिसत आहे. सुमारे 2 हजार सिम कार्ड पेस्ट करून हा पोशाख तयार केला जातो.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा