कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तब्बल चार दिवसांनी कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. पक्षाने आज 10 जनपथ येथे झालेल्या बैठकीनंतर सिद्धरामय्या हेच कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील, असा निर्णय घेतला आहे. 18 मे रोजी क्रांतीवीर स्टेडियमवर शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह 10 मंत्री शपथ घेणार आहेत. तर डीके शिवकुमार राहुल गांधींना भेटण्यासाठी 10 जनपथवर पोहोचले आहेत.