नवी दिल्ली – प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी Shweta Tiwari तिच्या सौंदर्यामुळे आणि दमदार अभिनयामुळे नेहमी चर्चेत असते. मात्र सध्या श्वेताने असे वक्तव्य केले आहे ज्यामुळे ती लोकांच्या निशाण्यावर येऊ शकते. तिने भोपाळमध्ये आपल्या ब्रा साइज आणि देवाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
काय म्हणाली श्वेता तिवारी?
बुधवारी श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी भोपाळला गेली होती. जिथे तिने आपल्या संपूर्ण टीमसह पत्रकार परिषदेत भाग घेतला. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना श्वेता तिवारीने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ती बोलताना म्हणाली, माझ्या ‘ब्रा’ची साईज देव घेतोय’.
अभिनेत्री श्वेता तिवारी का भोपाल में विवादित बयान, कहा मेरे ब्रा का साइज़ भगवान ले रहे हैं !!
हिन्दू संगठन ने दी माफी मांगने की चेतावनी !!@JournalistVipin #ShwetaTiwari #hinduism pic.twitter.com/zrsBA6gMg8
— Sanket Pathak (@imsanketpathak) January 27, 2022
श्वेता तिवारी आणि रोहित रॉय Rohit Roy काल भोपाळमध्ये वेब सिरीज ‘शो स्टॉपर’ ची घोषणा करण्यासाठी गेले होते. श्वेताने भोपाळमध्ये मीडियासमोर लोकांची मने दुखावणार असं विधान केले आहे. त्यामुळे ती अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. स्टेजवरील चर्चा सुरू असताना श्वेता तिवारीने गंमतीने हे वादग्रस्त विधान केले आहे. श्वेता तिवारीचा वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यापूर्वीही श्वेता तिवारी वादात सापडली होती
श्वेता तिवारी वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे कौटुंबिक वाद मीडियासमोर आले आहेत. आधी तिचा पती राजा चौधरी Raja Chaudhary आणि नंतर तिचा दुसरा पती अभिनव कोहलीसोबतचे Abhinav Kohli तिचे वाद मीडियात चांगलेचं चर्चेत आले होते.