पहिल्या दिवसअखेर भारताच्या 4 बाद 258 धावा, अय्यर-जडेजाने झळकावली शानदार अर्धशतकं

WhatsApp Group

कानपूर – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चालू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताने 4 बाद 258 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाने शानदार अर्धशतकं झळकावत भारताचा डाव सावरला. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर हा सामना सुरु आहे.


पहिल्या सत्रात भारताने 82 धावा करत 1 विकेट गमावला आहे होता. नंतर मंयक बाद झाल्यानंतर शुभमन गिलने दमदार फलंदाजी करत 93 चेंडूत 5 चौकार 1 षटकारासहं 52 धावावर आउट झाला. नंतर श्रेयस अय्यर 75 आणि रवींद्र जडेजा 50 धावांवर नाबाद आहे. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काइल  जेमिसनने सर्वाधिक ३ तर टिम साऊदीने 1 विकेट घेतला.


रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू कसोटी मालिका खेळणार नाहीत. त्याचबरोबर विराट कोहलीलाही पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. इतकेच नाही तर केएल राहुलही सामन्याच्या दोन दिवस आधी दुखापतीमुळे दोन्ही सामन्यांमधून बाहेर पडला होता. दुसरीकडे, केन विल्यमसन, रॉस टेलर आणि काइल जेमिसन यांच्या पुनरागमनामुळे न्यूझीलंडचा संघ खूपच मजबूत दिसत आहेत. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्रेयस अय्यरचे कसोटीत पदार्पण

या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाजीसाठी श्रेयस अय्यरला संघात संधी देण्यात आली आहे. भारताकडून कसोटीमध्ये पदार्पण करणारा तो 303 वा खेळाडू आहे. सुनील गावस्कर यांच्या हस्ते श्रेयस अय्यरला पदार्पण कॅप देण्यात आली. श्रेयस अय्यरने भारतासाठी आतापर्यंत 22 वनडे आणि 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत

पहिल्या कसोटी सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ

न्यूझीलंडचा संघ – केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, विल यंग, ​​रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, रचिन रवींद्र, काइल जेमीसन, टिम साउथी, अजाज पटेल, विल सोमरविले.

भारतीय संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, इशांत शर्मा.