IND vs NZ: शुभमन गिलने मोडला क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ विक्रम

WhatsApp Group

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने द्विशतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. त्याने 208 धावांची तुफानी इनिंग खेळली. या डावात गिलच्या बॅटमधून 19 चौकार आणि 9 तुफानी षटकार निघाले. गिलने 145 चेंडूत द्विशतक ठोकून महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरने पहिले एकदिवसीय द्विशतक अवघ्या 147 चेंडूत झळकावले होते. त्याने 24 फेब्रुवारी 2010 रोजी ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 200 धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्याने 147 चेंडूंचा सामना केला, तर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध 145 चेंडूत द्विशतक पूर्ण केले आणि 149 चेंडूत 208 धावा केल्या.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकात 8 विकेट गमावून 349 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 34, शुभमन गिलने 208, सूर्यकुमार यादवने 31, हार्दिक पंड्याने 28 धावांचे योगदान दिले. आता न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी 50 षटकांत 350 धावा करायच्या आहेत.

सर्वात कमी चेंडूत द्विशतक करणारे खेळाडू

सचिन तेंडुलकर – 147 चेंडू
शुभमन गिल – 145 चेंडू
रोहित शर्मा – 156 चेंडू
रोहित शर्मा – 151 चेंडू
ख्रिस गेल – 138 चेंडू
मार्टिन गप्टिल – 153 चेंडू
रोहित शर्मा – 151 चेंडू
फखर जमान – 148 चेंडू