Datta Jayanti 2022: श्री दत्त जयंतीच्या शुभेच्छा देणारे संदेश..

WhatsApp Group

आज दत्त जयंती निमित्त काही निवडक अशा सुंदर अशा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये ( Datta jayanti wishes quotes in marathi ) घेऊन आलों आहोत. या दत्त जयंतीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता तसेच दत्तात्रेय जयंती बॅनर फोटो व्हाट्सअप्प स्टेटस मराठीत सुद्धा पाठवू शकता. खालील फेसबुक व्हाट्सअप्प ट्विटर इंटग्राम वर शेअर करू शकता .

दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उत्मन, मी तू पणाची झाली बोलवण तु एका जनार्दनी  श्रीदत्त ध्यान , श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा !!

ज्याच्या मनी गुरू विचार , तो नसे कधी लाचार , ज्याच्या अंगी गुरू भक्ती , त्याला नाही कशाची भिती , ज्याच्या ह्रदयात गुरू मुर्ती , त्याची होई जगभरात किर्ती , जो करेल गुरू ची पुजा , त्याच्या आयुष्यातुन संकटे होती वजा , दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा..!!

शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते…. आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते.

ज्याच्या हयात गुरु मूर्ती त्याची होई जगभरात किर्ती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होईल बजा , दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट !दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!.

दत्त दत्त दत्ताची गाय गायच दुध दुधाची साय सायच दही दह्याच ताक ताकाच लोणी लोण्याच तुप तुपाची धार दत्त दत्त दत्ताची गाय . दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णु, महेश्वरा!! • दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! ॐ दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री दत्त जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा , दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा,हे नामामृत भवभयहारक अघसंहारक त्रिभुवनतारक  , आत्मसुखाचा मोक्ष लुटाया अमोल ठेवा हाति धरा ,दत्तचरण माहेर सुखाचे दत्तभजन भोजन मोक्षाचे ,कवच लाभता दत्तकृपेचे कळिकाळाचे भय न जरा ,हा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता योगज्ञान-उद्गाता, त्राता दत्तचरित मधु गाता गाता भवसागर हा पार करा. सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा