न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराटची जागा घेणार ‘हा’ फलंदाज

WhatsApp Group

नवी दिल्ली – टीम इंडिया 25 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहली विश्रांतीवर असणार त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पण पहिल्या कसोटीत विराटच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

विराट कोहलीच्या जागी दुसरा कोणी फलंदाज नसून श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आलं आहे. पहिल्या कसोटीत विराटऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी श्रेयस सर्वात मोठा दावेदार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही तो बराच काळ या क्रमांकावर टीम इंडियाकडून खेळत आहे. अय्यरसाठी ही भारताकडून खेळताना पहिलीच कसोटी मालिका असेल.

श्रेयस अय्यरला प्रथमच संघात संधी देण्यात आली आहे. मात्र सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेसाठी सूर्यकुमार यादवचा संघात प्रथमच समावेश करण्यात आला होता. टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांनंतर सूर्यकुमार यादव आता कसोटी सामन्यांमध्ये खेळताना दिसेल अशी सर्वांना अपेक्षा होती, मात्र असे काहीच घडले नाही त्याला एकाही सामन्यातं खेळवलं गेलं नाही.

त्याचबरोबर काही नवीन खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. असे अनेक खेळाडू आहेत जे भारतासाठी पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहेत. त्यात युवा फलंदाज केएस भरत आणि स्वतः श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णाचे नावही या यादीत आहे. तसेच जयंत यादवला प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आले. तर पुन्हा एकदा शुभमन गिलचेही कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.

असा आहे पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत. शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध्द कृष्णा