भारताला धक्का, दिग्गज फलंदाज दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

WhatsApp Group

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका बुधवारपासून सुरू होत आहे. मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा श्रेयस अय्यर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे Shreyas Iyer ruled out .

बीसीसीआयने याबाबत माहिती देताना सांगितले क,  टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. तो पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) जाणार आहे. निवड समितीने श्रेयस अय्यरच्या जागी रजत पाटीदारचा संघात समावेश केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.


न्यूझीलंडविरुद्ध अद्ययावत केलेला भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.