ICC T20I फलंदाजांच्या क्रमवारीत श्रेयस अय्यरने घेतली 27 स्थानांनी झेप घेतली, मिळालं ‘हे’ स्थान

WhatsApp Group

श्रीलंकेविरुद्ध खेळली गेलेली ३ सामन्यांची टी-२० मालिका भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरसाठी Shreyas Iyer खास ठरली आहे. या टी-२० श्रेयसने सलग तीन अर्धशतके झळकावली होती. एवढेच नाही तर संपूर्ण टी-२० मालिकेत एकदाही बाद झाला नाही. त्याच्या य शानदार कामगिरीचा फायदा त्याला आयसीसी टी-२० क्रमवारीत ICC T20I Rankings झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या T20I फलंदाजांच्या क्रमवारीत श्रेयस अय्यरने 27 स्थानांनी मोठी झेप घेतली आहे.

भारतीय संघाने श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला आणि त्यानंतर आयसीसीने सुधारीत टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. या मालिकेत श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध २०४ धावा केल्या. यामुळेच तो प्रथमच ICC T20 क्रमवारीत अव्वल 20 मध्ये पोहोचला आहे. तो सध्या 18 व्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी तो ICC टी-२० क्रमवारीत 45व्या स्थानी होता.

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही तीन स्थानांची प्रगती करत 17व्या स्थानी पोहोचला आहे. त्याचवेळी विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धची शेवटची टी-20 मालिका आणि श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आणि त्याला तोटा सहन करावा लागला. तो टॉप-10 मधून बाहेर पडला असून सध्या तो 15 व्या स्थानावर आहे.