पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा श्रेयस अय्यर बनला 16 वा भारतीय फलंदाज

WhatsApp Group

कानपूर – न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरने 157 चेंडूत आपलं कसोटीतील पहिलं शतक झळकावलं आहे. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो 16 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच तो कसोटी सामन्यात पदार्पण करणारा तो 303 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला सुनील गावस्कर यांच्याकडून कसोटी कॅप देण्यात आली. पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच त्याने शतक झळकावून अनेक विक्रम केले आहेत. श्रेयस अय्यरने कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 157 चेंडूत शतक पूर्ण केले आणि पदार्पणात शतक झळकावणारा तो 16 वा भारतीय फलंदाज ठरला. या सामन्यात श्रेयस 171 चेंडूमध्ये 105 धावा करून बाद झाला

श्रेयस हा न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करताना कसोटी सामन्यात शतक पूर्ण करणारा तिसरा फलंदाज ठरला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यरने हे शतक 157 चेंडूत पूर्ण केले, जे कसोटी सामन्याच्या दृष्टीने जलद शतक मानले जाऊ शकते. श्रेयस अय्यरने वयाच्या 26 वर्षे 355 दिवसातं ही मोठी कामगिरी केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या चालू असलेल्या मालिकेत श्रेयसला भारतीय संघात स्थान मिळाले. भारतीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू विश्रांती घेत आहेत, त्यामुळे नवीन खेळाडूंना संघात स्थान देण्यातं आलं आहे. श्रेयसला कानपूर कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली, सुनील गावस्कर यांनी त्याला कसोटी कॅप दिली.

अय्यर गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या स्वरूपाचे सामने खेळला नव्हता. गेल्या वर्षी खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो अनेक महिने भारतीय संघातून बाहेर होता.