Siddhanth kapoor : श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला अटक

WhatsApp Group

बॉलिवडू विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर याला ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंगळुरूच्या रेव्ह पार्टीतून सिद्धांत कपूरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकाराने बॉलिवूड विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे. सिद्धांत स्वतःही फिल्म लाइनमध्ये आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याची कारकीर्द फ्लॉप ठरली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तो वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला आहे. हसीना पारकर या चित्रपटामध्ये सिद्धांतने श्रद्धासोबत काम केले होते. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर एनसीबीच्या रडारखाली आली होती. या संदर्भात एनसीबीच्या टीमकडून श्रद्धा कपूरचीही चौकशी करण्यात आली होती.