Shraddha Kapoor: श्रद्ध कपूर करणार लग्न? सोशल मिडीया पोस्टमधून दिले संकेत

WhatsApp Group

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पार्टनरसोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. परिणीती चोप्रा, कियारा आडवाणी आणि लिन लॅशराम यांनी मोठ्या थाटत लग्न केलं आहे. आता लवकरच अभिनेत्री रकुल प्रीत सिंग देखील लग्न करणार आहे. रकुल हिच्या अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील लग्ना करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. खुद्द श्रद्धा हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत भारी कॅप्शन दिले, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली. त्याचबरोबर या पोस्टवर चाहत्यांच्याही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. श्रद्धाने इंस्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. कानात अतिशय गोंडस कानातले घातलेल्या श्रद्धाच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

या पोस्टसोबत श्रद्धाच्या कॅप्शननेही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रद्धाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, मी छान दिसत आहे, मी लग्न करू का? यानंतर चाहत्यांकडून कमेंट्सचा ओघ आला. नेटकऱ्यांनी अनेक मनोरंजक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हास्यास्पद कमेंट करून अभिनेत्रीची फिरकी घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

एका यूजरने मिश्किलपणे लिहिले की, यासाठी तुला माझ्या आईशी बोलावे लागेल, तर दुसऱ्या युजरने स्थळ आणि मंडप सजवला आहे, लवकर ये, अशी टिप्पणी केली. श्रद्धाच्या या पोस्टवर अनेक स्टार्सही कमेंट करताना दिसले. श्रद्धाचा भाऊ सिद्धांत यानेही या पोस्टवर कमेंट करत हसणाऱ्या इमोजीसह ‘फुल टाईमपास’ असे लिहिले.

श्रद्धा कपूर हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘स्त्री 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. श्रद्धा हिचा ‘चंदू चॅंपियन’ सिनेमात देखील चर्चेत आहे. श्रद्धा कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.