
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात नव्याने बांधलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर तीन दिवसांनी एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तो माणूस गाडीच्या मागून हातात बंदूक घेऊन बाहेर येताना दिसत आहे. एका लोकप्रिय चित्रपटातील पार्श्वसंगीतासह एक माणूस शॉटगन उचलतो आणि हवेत गोळीबार करतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समृद्धी महामार्गावर तरुणाकडून गोळीबार, व्हिडीओ आला समोर pic.twitter.com/MHPB6ceK5d
— Inside Marathi (@InsideMarathi) December 14, 2022