
बायको (Wife) माहेरी गेल्यामुळे आतीव दु:ख झाल्याने जालना येथील एका दारुड्या नवऱ्याने (Husband ) ‘शोले स्टाईल’ आंदोलन (Sholay-Style Protest) केले आहे. बायकोच्या विरहाने व्याकूळ झालेला हा इसम दारुच्या नशेतच टल्ली झाला. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने चक्क मोबाईल टॉवर (Mobile Tower) गाठला. मोबाईल टॉवरवर चढत त्याने शोले स्टाईल आंदोलन सुरु केले.
या तरुणाचं नाट्य जवळपास 4 तास चालले. जालना (Jalna) जिल्ह्यातील बदनापूर (Badnapur) तालुक्यातील दाभाडी (Dabhadi) येथे हा प्रकार बुधवारी (20 जुलै) घडला.
बायको माहेरी गेल्याने आतीव दु:ख झाल्याने जालना येथील एका दारुड्या नवऱ्याचं ‘शोले स्टाईल’ आंदोलन pic.twitter.com/JWLZfRVpRx
— Inside Marathi (@InsideMarathi) July 21, 2022
गणपत बकाल असं या तरुणाचे नाव आहे. टॉवरवर चढलेल्या गणपत बकाल याला खाली उतरण्यासाठी ग्रामस्थ अवाहन करत होते. परंतू, दारुच्या नशेत टल्ली झालेल्या गणपतच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचत नव्हता. गावकरी त्याला अवाहन करत होते तेव्हा सुरुवातीला तो माझी बायको माहेरी गेली आहे. तिला परत आणा. तरच मी खाली उतरेन असं तो म्हणत होता. गावकरीही त्याची समजूत घालत होते. मात्र, पुढे त्याने भलतीच असंबद्ध बडबड सुरु केली. त्यामुळे गावकऱ्यांचाही नाईलाज झाला. अखेर 4 तासांनी तो खाली उतरला.