नाशिक – वीजपुरवठा पूर्ववत करावी या मागणीसाठी नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले आहे Nashik Farmer Agitation. महावितरणच्या या कारभाराला कंटाळून सय्यद पिंप्री येथील शेतकऱ्यांनी उच्च दाब वाहिनीच्या टॉवरवर चढूनच शोले स्टाईल आंदोलन केले.
सय्यद पिंप्री येथील शेतकऱ्यांना कोणतीच नोटीस न देता विज बंद केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत.
यंदा मूलबक प्रमाणात पाणी असतानाही केवळ महावितरणाने वीजपुरवठा बंद केल्यामुळेच पिकांना पाणी देऊ शकत नसून पिंकाचे खूप मोठे नुकसान होत आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.