Shocking Video: चालत्या ट्रेनमधून कोसळली महिला

WhatsApp Group

दुर्घटना कधी आणि कोणासोबत घडेल, हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र बऱ्याचदा मोठ्या अपघातांमधूनही लोक अगदी थोडक्यात बचावल्याचं पाहायला मिळतं. देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण खरी सिद्ध करणाऱ्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात.

अशीच एक घटना नुकतीच ओडिशाच्या भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर (Bhubaneswar Railway station) पाहायला मिळाली. यात प्लॅटफॉर्मवर एक महिला धावत्या ट्रेनमधून कोसळली (Woman Fell from Train). मात्र सुदैवाने यात तिचा जीव वाचला.

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) दक्ष जवानांनी बुधवारी एका प्रवाशाचा जीव वाचवला. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडलेल्या एका महिला प्रवाशाला आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल एस मुंडा यांनी वाचवलं. सरस्वती असं या ५८ वर्षीय महिलेचं नाव आहे. हेड कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण वाचले अन्यथा ती ट्रेनखाली येण्याची शक्यता होती.