धक्कादायक! विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

0
WhatsApp Group

बेळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे विजेच्या धक्क्याने आजी आजोबासह छोट्या नातीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी सकाळी शाहूनगर येथील अन्नपूर्णावाडी येथे घडली आहे.

इराप्पा गंगाप्पा राठोड (वय 50), पत्नी शांता (वय 45) आणि नात अन्नपूर्णा होनप्पा लमानी (वय 7) अशी विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्यांची नावे आहेत.  नेमकी घटना कशी घडली याची चौकशी पोलीस करत आहेत.