सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पांगरी शिवशाही बस मध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
राजू हिरामण ठुबे (49) रा दोनवाडे (भगूर), ता. नाशिक असं आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. चालक राजू हिरामण ठुबे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार क्रमांक एक मध्ये कार्यरत होते.