धक्कादाय निकाल! साताऱ्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा अवघ्या एका मताने पराभव!
सातारा – जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता साताऱ्यात राडेबाजी पाहायला मिळाली आहे . राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवामुळे साताऱ्यात राडेबाजी पाहायला होताना दिसत आहे.
शशिकांत शिंदे यांच्या पराभावामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावार दगडफेक केली आहे. जावळी सोसायटी गटातून झालेल्या या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांना 24 मते मिळाली तर विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळाली. या निकालानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील या दोन महत्वाच्या जिल्हा बँका कोणाच्या हातात जाणार याकडे सर्वांच लक्ष होतं. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शशिकांत शिंदे यांना एक मताने पराभव स्वीकारावा लागला. जावळीतील या जागेसाठी 100 टक्के मतदान झालं असून सर्व मतदारांनी मतदान केलं आहे.
माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना त्यांच्या होम पिचवरच पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या विरोधात त्यांचेच कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे हे उभे होते. निवडणुकीवेळी शशिकांत शिंदे यांचा पराभव होणार अश्या चर्चाही रंगल्या होत्या. या निकालाची उत्सुकता सर्व बड्या नेत्यांना लागली होती. मात्र आमदार शशिकांत शिंदे यांचा 1 मताने निसटता पराभव झाल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आणि सहकारी पॅनेलला मोठा धक्का बसला आहे.
जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना एका मताने पराभव स्वीकारावा लागला. तर यातं ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवला. पाटण विकास सेवा सोसायटी गटातून सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर यांनी विजय मिळवला असून, प्रतिस्पर्धी राहिलेले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवला असून, त्यांनी उदयसिंह उंडाळकर यांना पराभूत केले आहे.