धक्कादायक! दागिन्यांसाठी 3 वृद्ध महिलांचा खून

WhatsApp Group

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी या गावातील एकाच कुटुंबातील तीन वृद्ध महिलांचा खून करण्यात आला आहे.

आरोपीने वृद्ध महिलांचा खून करत त्यांना जाळण्याचा प्रयत्न देखील केला आहे. या वृद्ध महिलांच्या अंगावरील दागिने मिळवण्यासाठी हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी आता आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे आणि रुक्मिणी पाटणे अशी हत्या झालेल्या वृद्ध महिलांची नावे आहेत.