बदलापूर पुन्हा हादरलं, खेळायच्या बहाण्याने मुलाने अंधारात नेलं…6 वर्षाच्या चिमुकलीवर 16 वर्षीय मुलाकडून अत्याचार

WhatsApp Group

अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराने बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे. बदलापूरमध्ये 6 वर्षांच्या मुलीसोबत गैरकृत्य करण्यात आल्याची धक्कादाक घटना समोर आलीय. बदलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडलाय.एका 16 वर्षांच्या मुलाकडून या अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य करण्यात आलंय.

6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला खेळायच्या बहाण्याने मुलाने अंधारात नेलं आणि तिच्यासोबत गैरकृत्य केलं. शाळेच्या जायच्या वेळेत शाळेत जायचं नाही, असं मुलीनं आपल्या आईला सांगितलं. आईनं तिची विचारपूस केली. विश्वासात घेऊन मुलीला विचारलं, तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

यानंतर पीडित मुलीच्या आईनं बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर पोक्सो आणि ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.