
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत एका मुलीसोबत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. राजधानीतील कांझावाला भागात कारमधील मुलांनी धडक एका स्कूटी चालवणाऱ्या मुलीला धडक दिली आणि त्यानंतर तिला 7 ते 8 किमीपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत पीडित मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी आधी मुलीच्या स्कूटीला त्यांच्या कारने धडक दिली आणि नंतर तिला सुमारे 7 ते 8 किमीपर्यंत फरफटत नेलं. या घटनेबाबत समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मुलीच्या दोन्ही पायांवर, डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर खोल जखमांच्या खुणा आहेत. विशेष म्हणजे ही घटना अशा वेळी घडली जेव्हा संपूर्ण दिल्ली पोलीस आणि अगदी दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा हे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गस्तीवर होते. सध्या या संपूर्ण प्रकरणातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 26 वर्षीय दीपक खन्ना, 25 वर्षीय अमित खन्ना, 27 वर्षीय कृष्णा, 26 वर्षीय मिथुन आणि 27 वर्षीय मनोज मित्तल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या घटनेबाबत पीडित मुलीच्या मामाने सांगितले की, हे प्रकरण ‘निर्भया’सारखे आहे. या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी होऊन आमच्या भाचीला न्याय मिळावा, अशी आमची इच्छा आहे. त्याचबरोबर माझ्या मुलीसोबत अपघात झाला असून तिच्यासोबत ‘चुकीचे काम’ही घडल्याचे पीडितेच्या आईचे म्हणणे आहे. यापूर्वीही तिचा अपघात झाला होता, त्यावेळीही तिचे कपडे फाटले होते, मात्र यावेळी तिच्या अंगावर एकही कपडा शिल्लक नाही. तिचा मृतदेहही आम्हाला दाखवला जात नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी माझी इच्छा आहे.
दुसरीकडे, बाहेरील दिल्लीचे डीसीपी हरेंद्र कुमार सिंह यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधताना सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या गोष्टींनुसार, आरोपी मुले नवीन वर्ष साजरे करून मुरथल येथून परतत होते. मृत मुलीचे कुटुंब अमन विहार येथे राहते. मयत मुलीच्या घरात आई व चार भावंडे असून, त्यात ती मोठी बहीण असून तिला दोन लहान भाऊ आहेत. एक 9 वर्षांचा तर दुसरा 13 वर्षांचा आहे. वडिलांचे आधीच निधन झाले आहे. एका बहिणीचे लग्न झाले आहे.
दिल्ली के कंझावला में एक लड़की की नग्न अवस्था में लाश मिली, बताया जा रहा है कि कुछ लड़कों ने नशे की हालत में गाड़ी से उसकी स्कूटी को टक्कर मारी और उसे कई किलोमीटर तक घसीटा।
ये मामला बेहद भयानक है, मैं दिल्ली पुलिस को हाज़िरी समन जारी कर रही हूँ। पूरा सच सामने आना चाहिए।— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 1, 2023
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही या संपूर्ण प्रकरणावर शोक व्यक्त केला आहे. या घटनेबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे. मालीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, दिल्लीच्या कांझावाला येथे एका मुलीचा विवस्त्र मृतदेह सापडला आहे, असे सांगण्यात येत आहे की मद्यधुंद अवस्थेत काही मुलांनी तिच्या स्कूटीला कारने धडक दिली आणि तिला अनेक किलोमीटरपर्यंत फटफटत नेलं. हे प्रकरण धक्कादायक आहे, मी दिल्ली पोलिसांना हजर राहण्याचे समन्स बजावत आहे. संपूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे.