नाशिक: नाशिक शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जाधव संकुल परिसरामध्ये राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबामधील तीन वर्षाच्या मुलाच्या अंगावर घरातील लाकडी कपाट पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोरआली आहे.
तीन वर्षांच्या बाळाच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शौर्य सुजित विश्वकर्मा असं या लहान मुलाचं नाव आहे.