राजस्थान – देशात सर्वच रांज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये महिला अत्याचारच्या घटना वाढल्याचे समोर येत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात घडली आहे. एका 25 वर्षीय तरुणाने चक्क 64 वर्षीय महिलेसोबत गैरकृत्य करून तिला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झालावाड जिल्ह्यातील ही पिडीत महिलाशेतातून घरी येत असताना आरोपीने तिला पकडून तिच्याशी गैरवर्तन केले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. यानंतर आरोपीला 2 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वृद्ध महिलेवर सोबत ही घटना झालवार जिल्ह्यातील पिडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी रामनारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची पोलीस रिमांड कालावधीत कसून चौकशी करत आहेत.
स्टेशन प्रभारी यांनी सांगितले की, आरोपी तरुण हा अविवाहीत आहे. तो पेढवा शहरातील रहिवासी आहे. महिलेच्या तक्रारीवरून त्याचा तात्काळ शोध घेत असताना पोलिसांनी आरोपी तरुणाला पिडावा गावातूनच पकडले.
पिडावा पोलिसांनी सांगितले की, पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने आपल्याकडे तक्रार नोंदवली आहे. यात तिने असं म्हटलंय की, गारखेडी गावाजवळील रस्त्यावर पिडावा येथून दुचाकीवर आलेल्या रंगा उर्फ दुर्गालाल ढोली या युवकाने आपल्याला अडवले व गाडीवरून जवळच असलेल्या एका शेतात घेऊन गेला. तिथे त्याने आपल्यासोबत गैरकृत्य केलं. त्याचवेळी तीथे दोन ग्रामस्थ येत असल्याचे पाहून आरोपी तेथून पळून गेला होता. मात्र पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलंय.