जळगावमधील भडगाव तालुक्यामध्ये एका गावात राहणाऱ्या लहान मुलीचा खून करून तिचा मृतदेह गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमधील संशयित आरोपीला गुरुवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-19 वर्ष) असं संशयिताचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या आरोपी तरुणाने मुलीवर अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या भांडणात तरुणाने तिच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला. नंतर मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यात लपवून ठेवला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.